Kalicharan Maharaj Booked For Hate Speech in Ahmednagar  Saam TV
महाराष्ट्र

Kalicharan Maharaj Booked : कालीचरण महाराजांवर नगरमध्ये गुन्हा, नेमकं काय आहे प्रकरण?

Ahmednagar News : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांना नगरच्या सभेत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे.

Nandkumar Joshi

सुशील थोरात, अहमदनगर

Ahmednagar News : वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे.

अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर शहरात सकल हिंदू समाजातर्फे १४ डिसेंबर २०२२ रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला कालिपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी उपस्थित होते.

यावेळी कालीचरण महाराज यांनी मोर्चानंतर झालेल्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कालीचरण महाराज यांच्याविरोधात १५३ (अ) आणि ५०७ (२) या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Ahmednagar Police)

कालीचरण महाराज यांच्या भाषणाला जवळपास पाच महिने होऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच महात्मा गांधींबद्दल केलं होतं वक्तव्य

कालीचरण महाराज यांनी काही दिवसांपूर्वीच महात्मा गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांच्याबाबत केले ते योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असे ते म्हणाले होते. यावरून मोठा वाद उफाळला होता. यापूर्वीही त्यांनी महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT