Kalicharan Maharaj Saam Tv
महाराष्ट्र

Kalicharan Maharaj : धाराशिव लोकसभा निवडणूक लढवणार ? राजकारणातील प्रवेशाबाबत कालीचरण महाराज स्पष्टच बाेलले

ओवैसी चालतात मग कालीचरण महाराज का नाही यावर ते म्हणाले, मला समजत नाही. जनता ठरवू शकते ते कसे आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News : छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य पूर्ण व्हावे ही इच्छा आहे. इराण पासून श्रीलंका पर्यंत भारताचे जेवढे तुकडे झाले आहेत. त्यांचा पुन्हा एकत्र भारत व्हावा. त्यामुळेच राजकारणाचे आम्ही हिंदूकरण व्हावे अशी मागणी करीत आहाेत. देशातील हिंदूंनी एकत्र येऊन एक व्हाेटर बँक तयार करण्यासाठी संघटित झाले पाहिजे. जेणेकरुन हिंदू राष्ट्र हाेणे सुकर हाेईल असे मत कालीचरण महाराज (kalicharan maharaj latest marathi news) यांनी साेलापूरात माध्यमांशी बाेलतना व्यक्त केले. (Maharashtra News)

राजकारणात प्रवेश करणार ?

कडवे आणि तिखट भाषा असणाऱ्या आमच्यासारख्यांचे राजकारणात काही होऊ शकत नाही असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केली. धाराशिव (dharashiv) येथून निवडणूक लढणार आहात का या प्रश्नावर कालीचरण महाराज यांनी काय सांगता अशी बातमी तुमच्याकडे आहे असे म्हणत याबाबत मला तर माहित नाही परंतु कडवे आणि तिखट भाषा असणारे लोक चालतील का असा प्रतिप्रश्न कालीचरण महाराज यांनी केला.

ओवैसी (Owaisi) चालतात मग कालीचरण महाराज का नाही यावर ते म्हणाले, मला समजत नाही. जनता ठरवू शकते ते कसे आहे. मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. जनतेने जर सांगितले निवडणूक लढवू पण मला कोणता पक्ष तिकीट देईल असेही त्यांनी म्हटले.

ते म्हणाले आमचं काम कट्टर हिंदू व्हाेटर बनवायचा आहे. जे हिंदू राजे (लाेकप्रतिनिधी) आहेत त्यांना जिंकण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न करताे. आमचं काम निवडणुकीतून राजा हाेणे नाही तर राजा बनवणे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर मी डिप्लोमॅटिक विचार करून केले असते तर आज मी जात, आंदोलन याविषयी बोललो असतो. निवडणूक लढवण्याचा मी कधीच विचार केला नाही असेही कालीचरण महाराज यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT