kalamb state transport employee protests
kalamb state transport employee protests 
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; घटनास्थळी पोलिस दाखल

साम टिव्ही ब्युरो

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन थांबायचे नाव घेत नाहीये. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पावित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे MSRTC मंत्री अनिल परब Anil Parab यांच्या आश्वासनानंतर राज्यातील काही जिल्ह्यात कर्मचा-यांनी आंदोलन मागे घेतले आहे. परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले आहे. आता हे आंदोलन चिघळले असून कळंब येथील एसटी आगारा समोरील झाडावर एक कर्मचारी चढून बसला असून गळ्यात फास आडकवला आहे. MSRTC Employee Strike In Osmanabad District Kalamb Depo

हा कर्मचारी आज (साेमवार) पहाटेपासून झाडावर चढून बसला आहे. मी आत्महत्या केल्याने माझे इतर सहकाऱ्यांच्या प्रश्न सुटतील असे म्हणत कर्मचारी झाडावर चढून बसला असून येथे या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांनी टाहो फोडण्यास सुरुवात केली.

घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले आहे. सध्या विनंती करून कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी सांगण्यात येते आहे. मात्र अद्यापही हा कर्मचारी ऐकायला तयार नाही.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Crisis News: छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाच्या झळा! पाण्याला मिळतोय सोन्याचा भाव; टँकर वाल्यांची चांदी

Baramati Lok Sabha Votting Live: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

SCROLL FOR NEXT