Neknur Police Station, Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड: कलाकेंद्र चालकाकडून गुंडाकरवी पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांची भूमिका संशयास्पद?

बीडचे नेकनूर पोलीस त्या कलाकेंद्र चालकांवर मेहेरबान... त्या पीडितेसंदर्भात थातुरमातुर कारवाई तर आरोपीला सोडलं मोकाट..

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: कला केंद्रावर काम करणाऱ्या एका 34 वर्षीय महिलेला अमानुष मारहाण करत बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर महिलेला दमदाटी करून तिच्या मुलीला डांबून ठेवल्याचा प्रकार, बीडच्या नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला होता. मात्र या प्रकरणात नेकनूर पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत केवळ थातुरमातूर कारवाई केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. तर याचीच बातमी करण्यासाठी गेलेल्या स्थानिक पत्रकाराला, गाडी आडवी लावून जीवे मारण्याची धमकी पोलीस ठाण्यात आलेल्या गुंडांनी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक काळकुटे यांनी केलाय.

बीड - सोलापूर महामार्गावरील उदंड वडगाव येथे असणाऱ्या, कला केंद्रातील एका 35 वर्षीय महिलेला बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला लावुन, तिच्या 12 वर्षीय मुलीला डांबुन ठेवल्याची तक्रार पिडीतेने पोलीस अधीक्षकांना दिली होती. याचीच बातमी साम टिव्हीने दाखवली होती. याची दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेत, त्यांनी थेट संबंधित नेकनूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, मुस्तफा शेख यांना फोन करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

हे देखील पाहा-

मात्र नेकनूर पोलिसांनी पीडिता ही खोटं बोलत आहे, म्हणत केवळ थातूर मातूर कारवाई केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप पर्यंत संबंधित आरोपीला अटक करण्यात आली नसून पिडीतेच्या 12 वर्षीय मुलीची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Infection: शरीराच्या या भागात वेदना होत असेल तर समजा लिव्हर खराब झालंय; इन्फेक्शनचे असतात हे संकेत

Homemade Idli Recipe: घरीच बनवा साऊथ इंडियन स्टाईल इडली, लगेच करा नोट करी ही रेसिपी

Bhau Kadam: 'वडील फक्त रडत होते…', भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ खास भावनिक प्रसंग, म्हणाले- 'आज इतकं नाव कमावलं पण...'

पिंपळे परिवारावर दुखा:चा डोंगर; भाजप आमदाराच्या वडिलांचं निधन; मंत्र्यांकडून शोक व्यक्त

देशात मोठ्या घातपाताचा कट उधळला, डॉक्टराच्या घरातून 300 किलो RDX, एके ४७ अन्...

SCROLL FOR NEXT