Junnar Crime News Saamtv
महाराष्ट्र

Junnar Crime News: दुचाकीवरुन आले अन् दागिने ओरबाडून पळाले, भररस्त्यात धुम स्टाईल चोरी; थरारक घटना CCTVत कैद

Crime News Update: या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

रोहिदास गाडगे

Junnar Crime News: जुन्नर शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकी वरुन आलेल्या तीन तरुणांनी भर रस्त्यात महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने धुम स्टाईलने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पाळत ठेवून महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळाल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Junnar News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या, धुम स्टाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या जुन्नर शहरातही अशीच एक घटना समोर आली आहे. जुन्नर शहरातील शिवनेरी किल्ल्याकडे जाणा-या रस्त्यावर महिला फिरत असताना गळ्यातील दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेच्या अंगावरील दागिण्यांचा अंदाज घेऊन चोरट्यांनी महिला रस्ता ओलांडून जात असताना अंगावरील दागिने ओरबाडून पलायन केले. या धुम स्टाईल चोरीचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असुन जुन्नर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र भरदिवसा रस्त्यावर झालेल्या या धुमस्टाईल चोरीने महिला वर्गात भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल

Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! एकाच रिचार्जमध्ये मिळेल JioHotstar, Prime Video अन् इतका डेटा

Cheese Maggie Recipe: नेहमीची मॅगी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा चीज मसाला मॅगी

Kalyan Accident : कल्याणमध्ये प्रवासी कारचा भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू, नावं आली समोर

Maharashtra Weather : महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवस महत्त्वाचे, उष्णेतची तीव्र लाट येणार; अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशी पार

SCROLL FOR NEXT