Junnar Accident News Saam TV
महाराष्ट्र

Junnar Accident News: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एका कामगाराचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Junnar Accident News: जुन्नरमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर २ जण गंभीर जखमी झालेत.

Ruchika Jadhav

रोहिदास गाडगे

Junnar News:

जुन्नर तालुक्यातील वडज धरणाच्या कँनलमध्ये अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. उसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने एका ऊस कामगाराचा मृत्यू झालाय. या अपघातात दोन जण गंभीर जखमी आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विघ्नहर साखर कारखान्याकडे ऊस भरुन ट्रॅक्टर जात असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याची तक्रार जुन्नर (Junnar) पोलीसांत करण्यात आलीये. अपघातात एका कामगाराच्या मृत्यूसह दोघांना झालेल्या गंभीर दुखापतीस जबाबदार ठेवत ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सतिष चव्हाण असे अपघातात मृत्यू झालेल्या ऊस कामगाराचे नाव आहे. यामध्ये योगेश पवार,गोपाळ राठोड गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा चक्काचूर झाला आहे.

भरधाव आयशरची ट्रॅकला धडक; चालकाचा जागीच मृत्यू

हिंगोलीतही सकाळी अपघाताची मोठी घटना घडली आहे. हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय. वाहन चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.

अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झालाय. हिंगोलीच्या माळहिवरा गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. ट्रक नागपूरमधून संत्री घेऊन निघाला होता. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. हिंगोलीच्या माळशिवरा गावाजवळ या दुर्घटनेत आयशर चालक शेख अनवर शेख कटूमिया हे जागीच ठार झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पदयात्रा आज अमरावतीत

Bharat Taxi App : स्वस्तात मस्त प्रवास! भारत सरकारची पहिली टॅक्सी सेवा सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Local Body Election: दुसऱ्या दिवशी वाढला मतदानाचा टक्का; शरद पवार गटाचा आरोप, EVM स्ट्राँगरुमबाहेर मविआचा राडा

Jaisalmer Best Place : जैसलमेर फिरायला जाताय? मग या ठिकाणी नक्कीच जा

Google Gemini Sketch Photos: स्केच करायचंय? पण जमतच नाही; हे 2 Prompt वापरा अन् राहा ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT