Shashikant Warishe case Saam tv
महाराष्ट्र

Shashikant Warishe: मोठी बातमी! पत्रकार शशिकांत वारिशेंचा अपघात जाणीवपूर्वक घडवला; विधानपरिषदेत सरकारची कबुली

Shashikant Warishe: या प्रकरणातला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यानेही वारिशेंवरचा हल्ला पूर्वनियोजित असल्याची कबुली दिली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Budget Session: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मंगळवारी (7 फेब्रुवारी) अपघाती मृत्यू झाला होता.मात्र त्यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. याबद्दलच्या तपास सुरू असतानाही अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या होत्या.

याबद्दल विधिमंडळ अधिवेशनात महत्वाचा खुलासा झाला असून शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांची जाणीवपूर्वक अपघात घडवून आणल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे. (Maharashtra Politics)

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने मोठा खुलासा केला आहे. शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्य सरकारने लेखी उत्तर दिले आहे. ज्यामध्ये शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणला, असं राज्य सरकारने विरोधकांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटलं आहे. तसंच सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहितीही दिली आहे.

दरम्यान, राजापूर (Ratnagiri) येथे ठिकाणी पेट्रोल पंपावर 'थार' गाडीनं शशिकांत वारिसे यांच्या दुचाकी वाहनाला जोरात धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणातला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यानेही वारिशेंवरचा हल्ला पूर्वनियोजित असल्याची कबुली दिली होती. (Lates Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kulfi Recipe : मलाई कुल्फी खायची इच्छा झाली? घरच्या घरी अशी बनवा झटपट कुल्फी

Maharashtra News Live Update: अमरावतीत जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटना दुर्दैवी,दोषींवर कारवाई होणारच: बावनकुळे

Veg Hakka Noodles: रेस्टॉरंटसारखे चविष्ट व्हेज हक्का नूडल्स घरच्या घरी बनवा, वाचा सोपी रेसिपी

'शुद्धीकरण' वादाला नवं वळण; राहुल गांधींवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बदलणार; घराबाहेर पडण्यापूर्वी नवीन टाइम टेबल घ्या जाणून

SCROLL FOR NEXT