mukesh ambani jio x
महाराष्ट्र

Jio ग्राहकांना 5 हजार रुपये मिळणार? अंबानींकडून जिओ ग्राहकांना बंपर बोनस?

Fact Check : तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुम्हाला बंपर बोनस मिळणाराय...अंबानी ग्राहकांना 5 हजार रुपये खात्यात टाकणार असल्याचा दावा करण्यात आलाय...तसा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमच्या खात्यात 5 हजार रुपये जमा होणार आहेत...होय, असा दावा करण्यात आलाय...कारण, जिओ कंपनीला 8 वर्षे पूर्ण झाल्याने हा बोनस देत असल्याचा दावा करण्यात आलाय...सध्या जिओचे लाखो ग्राहक आहेत...त्यामुळे खरंच जिओच्या ग्राहकांसाठी अंबानी बोनस देणार आहेत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

जिओला 8 वर्षे पूर्ण झाल्यामुळे सर्व ग्राहकांना 5 हजार रुपयांचा बोनस दिला जातोय. पैसे खात्यात जमा करण्यासाठी दिलेलं कार्ड स्क्रॅच करा. यासोबतची लिंक उघडल्यावर पैसे खात्यात जमा होतात. हा मेसेज व्हायरल झाल्याने याबाबत थेट जिओ कंपनीकडेच माहिती मिळू शकते...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत माहिती मिळवली असता असा जिओने मेसेज पाठवला नसल्याचं स्पष्ट झालं...मग ही लिंक कुणी पाठवली...अशा लिंक उघडल्यास काय गंभीर परिणाम होतात...याबाबत आम्ही सायबर एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली... त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

- जिओ ग्राहकांना 5 हजार देणार हा दावा खोटा

- पैसे द्यायचे असते तर ग्राहकांच्या खात्यात टाकले असते

- कोणतीही कंपनी पैसे ट्रान्सफरसाठी लिंक देत नाही

- सायबर चोरटे लिंकच्या माध्यमातून फसवणूक करतात

- मेसेजसोबतची लिंक उघडून पाहू नका

आमच्या पडताळणीत जिओ ग्राहकांना 5 हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...त्यामुळे तुम्हाला जर असा कोणताही मेसेज किंवा लिंक आल्यास उघडू नका...यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PCOD ची समस्या कायमची दूर होऊ शकते का?

Bread Gulab Jamun : नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचे मऊ रसरशीत गुलाबजाम करण्याची रेसिपी घ्या जाणून

Politics : महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण सोडण्याचा निर्णय

Ulhasnagar Shocking : उल्हासनगर हादरलं! मध्यरात्री ४ जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ

Monsoon Health Tips: पावसाळ्यात स्कीन इन्फेक्शनचा त्रास? 'या' फॅब्रिकचे कपडे वापरा

SCROLL FOR NEXT