Hinganghat Bandh, Wardha News saam tv
महाराष्ट्र

Hinganghat Bandh News : आरएसएस जिल्हा संघचालक मारहाणप्रकरणी हिंगणघाट बंद; पाेलिसांची Social Media वर नजर

पाेलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : राष्ट्रीय स्वयंसेवकाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत (jethanand rajput) यांना मारहाण केल्याच्या निषेर्धात आज (साेमवार) हिंगणघाट बंदचे (Hinganghat Bandh) आवाहन करण्यात आले हाेते. त्यास समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान या घटनेची चर्चा वर्धा जिल्ह्यात सुरु असून या प्रकरणातील एका युवकास पाेलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

बसमध्ये सुरु असलेल्या वादात मध्यस्ती केल्याने जेठानंद राजपुत यांना सुमारे आठ ते दहा युवकांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे. अन्य संशयितांचा शोध सुरु आहे.

आज हिंगणघाट बंद

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आज (साेमवार) हिंगणघाट बंदची हाक दिली होती. त्यानूसार आज सकाळपासून हिंगणघाट येथे बंद आहे. या बंदला समिश्र प्रतिसाद असून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर काही संदेश व्हायरल करण्यात आले होते. संदेश व्हायरल झाल्याचे कळताच पोलीस अधीक्षकांनी सायबर टीमला हिंगणघाट येथे बोलवत तपासाला सुरवात केली आहे.

तणाव निवळला

नागरिकांनी कोणत्याही अफ़वांना बळी न पडण्याचा आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी केले आहे. हिंगणघाटात सध्या तणावाचे वातावरण निवळले असून पोलीस प्रशासन शांततेच आवाहन करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News : मुंबई-पुण्यात १० नवी मेट्रो सुरू होणार, नावे आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

UPI पेमेंट करणं आता नसणार फ्री? किती ट्रांजेक्शनवर किती लागेल शुल्क?

shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? आज फैसला, कोर्टातून आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र

Today's Horoscope : तुमचा आजचा दिवस कसा जाणार? ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस?

SCROLL FOR NEXT