Kolhapur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Breaking News: सहा तलवारी, अमली पदार्थासह दिलदार कांबळे अटकेत

या तलावारी काेणाला दिल्या जाणार हाेत्या का याचा तपास पाेलीस करीत आहेत.

संभाजी थोरात

काेल्हापूर : तलवारी व अमली पदार्थ विकणा-या दिलदार कांबळे यास काेल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील जयसिंगपूर पाेलीसांनी (jaysingpur police station) अटक (arrest) केली आहे. कांबळे याच्याकडून सुमारे सहा तलावारी तसेच 1590 ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. (kolhapur latest marathi breaking news)

दरम्यान काही दिवसांपासून महाराष्ट्रात तलावर विक्रीच्या प्रकरणात पाेलीस संशयित आराेपींना अटक करीत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात पाेलीस छापे टाकत आहे. जालना येथून देखील काही दिवसांपुर्वी माेठ्या प्रमाणात तलावारी जप्त करण्यात आल्या.

महाराष्ट्रातील काेल्हापूर जिल्ह्यात तलावारी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली हाेती. त्यानूसार शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे मध्यरात्री पाेलीसांनी छापा टाकला. यामध्ये तलवारी विकणारा दिलदार कांबळे यास जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा धारधार तलवारींसह गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

SCROLL FOR NEXT