satara, jayshree gore, pusegoan police saam tv
महाराष्ट्र

माझ्यासाठी ताे क्षण हाेता Do Or Die; तान्ह्या बाळासह तिघींचे जीवन वाचविणारी आई म्हणाली...!

अचानक गाेरेंच्या कारमध्ये एक युवक घुसला. त्याने कारचा ताबा घेतला आणि कार पळवू लागला.

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यातील (satara) पुसेगावमध्ये शनिवारी रात्री पुसेगावात सेवागिरी मंदिरा समोर अगदी मध्यवर्ती ठिकाणी एक भयानक प्रसंग घडला. रात्री उशिरा अंधाराचा फायदा घेत एका व्यक्तीने थांबलेली कार पाहून त्यात घुसून महिला (women) व लहान मुलगा असताना ही कार घेऊन पळून जायचा प्रयत्न केला मात्र गाडीतील जयश्री गोरे (jayshree gore) यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि केलेल्या विरोधामुळे त्या चोरट्याचा बेत फासला. या कुटुंबाने पोलिसांत (police) धाव घेतली आणि पोलिसांनी काही वेळातच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. (satara latest marathi news)

जयश्री गोरे आणि त्यांचे पती महेश हे आपल्या चार महिन्याचा मुलासह , आठ वर्षाच्या मुलीसह , भाची आणि दाजी यांच्या समवेत कामानिमित्त शिखर शिंगणापूर येथे गेले होते. रात्रीच्या सुमारास ते पुसेगाव येथे आल्यानंतर तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी जयश्री यांचे पती महेश आणि दाजी हे दोघेही कारमधून उतरले. ते पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले. यावेळी कारमध्ये जयश्री गोरे या चालकाच्या सीटलगत बसल्या होत्या. त्यांच्याजवळ त्यांचे लहान बाळ होते. यावेळी अचानक कारमध्ये एक युवक घुसला. त्याने कारचा ताबा घेतला आणि कार पळवू लागला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जयश्री गाेरेंसह कारमधील सर्वजण घाबरले. या परिस्थितीत जयश्री गोरे यांनी तान्ह्या बाळासह युवकाशी सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत झुंज दिली. अक्षरशः लाथाबुक्क्यांनी युवकास मारले. त्यामुळे कार एका लाकडाच्या ढिगाऱ्यावर जावून आदळली. त्यानंतर युवकाने घटनास्थळावरुन पलायन केले.

हा सगळा थरार दहा मिनिट सुरू होता. चालत्या कारमध्ये झालेल्या झटापटीत बाळासह जयश्री गोरे किरकाेळ जखमी झाल्या आहेत. पुसेगाव पोलिसांनी अभिजित फडतरे यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT