Minister Jaykumar Gore speaking at the BJP entry event in Phaltan; made explosive remarks against MLA Ramraje. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: देवेंद्र पावले, नाहीतर रामराजे नाईक जेलमध्ये गेले असते; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल|VIDEO

Ramraje Nimbalkar Political Downfall: फलटणमध्ये भाजप प्रवेश कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रामराजेंवर सडकून टीका केली.

Omkar Sonawane

ओंकार कदम, साम टीव्ही

सातारा: फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी व गाळेधारकांनी भाजपमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमात बोलत असताना मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रामराजे यांच्यावर जहरी टीका केली. आ.रामराजे यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर टीका करताना मंत्री गोरे म्हणाले, जुलमी इंग्रजांना घालवण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी सायमन कमिशनला गो बॅक चा नारा दिला. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. फलटणच्या स्वातंत्र्याची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे.येथील जुलमी राजवट आता संपुष्टात येत असून फलटण तालुकाच म्हणायला लागला राजे 'चले जाव'.

मार्केट कमिटीच्या माध्यमातून लोकांवर काळे कायदे लादणाऱ्या अन्याय करणाऱ्या बाबाला आता जनतेनं सांगितलंय बाबा (रघुनाथराजे) आता परत जावा. ते आ.रामराजे स्वतः काही करत नाहीत. मात्र, इतरांच्या मदतीने कारस्थाने करण्यात ते पटाईत आहेत. विकास कामे करून त्यांनी कोणालाही सोबत ठेवले नाही. असत्य, कटकारस्थान करून ते आसुरी आनंद घेत असतात. त्यातूनच माझ्यावर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एक तरी केस नव्याने टाकलीय.

ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवल्या, पोलीस स्टेशन दाखवलं. त्यांचीच चौकशी करायला पोलीस त्यांच्या दारात पोहोचले. तेव्हा त्यांना सामान्य माणसांच्या वेदना कळल्या असतील. यांच्या इतका भित्रा माणूस जगाच्या पाठीवर कोणी नसेल. स्वतःला वाचवण्यासाठी कुणाकुणाचे पाय धरले नाहीत. या जयकुमारवर 29 केसेस झाल्या पण मी कुणाच्या दारात गेलो नाही. माफी मागितली नाही,की वाचवा म्हटलो नाही.यांच्यावर एकदाच वेळ आली तर साहेब मला वाचवा. साहेबांना मी म्हटलं साहेब त्यांना माफ करून टाका जयकुमार गोरे व देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला माफ केलं नाहीतर तुम्ही जेलमध्येच असता

माझ्या प्रत्येक निवडणुकी वेळी एक तरी केस त्यांनी माझ्यावर टाकली घाबरलो नाही संघर्ष केला पुढे आलो. यांनी मात्र पाय धरणाऱ्यालाच पुढे आणायची बारामतीची शिकवण इथेही राबवली. मी मंत्री झाल्यावर मला घालवण्यासाठी कारस्थाने केली. केसेस घातल्या. दिल्लीच्या मांत्रिकाचा आधार घेतला. बायकांना पुढे केलं. बायकांचं संरक्षण करणारी आपली संस्कृती आहे . मर्द बायकांच्या आड लपत नाही. काय तुमचं कर्तृत्व? मालोजीराजेंचं अफाट कर्तृत्व होतं. त्यांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? त्यांची नावे सांगून नको ती कामे करता?

यापुढे त्यांचे नाव (आ.रामराजे) घ्यायचे नाही चाळीस वर्षात त्यांनी काय केलं हे यापुढे उगळत बसायचं नाही. किंबहुना यापुढे त्यांचं नाव घ्यायचंच नाही.जनतेसाठी जी काम करायची आहेत ती आपण करायची. तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग पूर्णपणे भरून काढ्याची आता आपली जबाबदारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Nalawade: 'फूलाआड दडलेलं सौंदर्य....' गौरी नलावडेनं केलं फोटोशूट

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

Sawan Somvar Upay: श्रावणाच्या पहिल्या सोमवारी बनतोय दुर्लभ संयोग; 'या' उपायांनी दूर होईल आर्थिक तंगी

Khanderi Fort : समुद्रात वसलाय सुंदर किल्ला, एकदा नक्कीच भेट द्या

Indian Railway : आता रेल्वे प्रवासात राहणार तुमच्यावर २४ तास नजर; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT