Rashtrawadi saam
महाराष्ट्र

Rashtrawadi: कृषीमंत्र्यांना शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावलं; "कृषीमंत्री सत्तेच्या मस्तीत.." वडेट्टीवारही कडाडले

Opposition Targets Ruling Government: नुकतेच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून कर्जमाफीबाबत खडे बोल सुनावले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Bhagyashree Kamble

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांना धाऱ्यावर धरत आहेत. नुकतेच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना उलट सवाल करत खडेबोल सुनावले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरूनही महायुती सरकारला चिमटा काढला आहे. ते जत तालुक्यातील तिकोंडी येथील जय हनुमान ग्रामीण बिगरशेती पथसंस्थेच्या नूतम इमारतीचा शुभारंभ सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

"सत्तेवर येण्याआधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली, त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र, सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिली", असे म्हणत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. "एकवेळ १५०० रूपयाचे २१०० दिले जातील, पण हे पैसे पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर दिले जातील", असं म्हणत जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेच्या दिल्या जाणाऱ्या अनुदानावर राज्य सरकारला चिमटा काढला आहे.

आमचा जोरात पराभव झाला

"सध्या मूळ प्रश्न सोडवण्यासाठी कमी प्रयत्न होत आहेत. महाविकास आघाडी सत्तेत असताना ३ लाख ६८९ शेतकऱ्यांना ३४१ कोटी ४८ लाख रूपयांची कर्जमाफी दिली होती. आता आम्ही काही घोषणा करू शकत नाही, कारण आमचा जोरात पराभव झाला आहे", असेही मिश्किलपणे जयंत पाटील म्हणाले आहेत.

कृषीमंत्री सत्तेच्या मस्तीत

"मराठवाडा अन् विदर्भात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. मात्र, असे असतानाही सरकार आणि कृषीमंत्री सत्तेच्या मस्तीत वावरत आहे. शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही", असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT