NCP LEADER Saam Tv News
महाराष्ट्र

Political News: 'विधानसभेचं रूप राहुल नार्वेकरांमुळे बदललं', शरद पवार गटातील बड्या नेत्यांकडून कौतुक

NCP Sharad Pawar group news praise Rahul Narvekar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुक. म्हणाले..

Bhagyashree Kamble

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. अशातच जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी कौतुक करत मिश्कील टोलेबाजी देखील केली आहे.

'विधानसभेचं रूप राहुल नार्वेकर यांनी बदललेलं आहे. तसेच त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाल्यामुळे, हे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाईल', असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

सांगलीच्या मिरज येथे ब्राह्मण समाजाच्यावतीने नूतन खासदार-आमदारांचा सत्कार पार पडला होता. हा सत्कार सोहळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी आमदार जयंत पाटील यांचा देखील सत्कार झाला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

३ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्याआधी नूतन खासदार-आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ्यात जयंत पाटील आणि राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं आहे.

'विधानसभेचं रूप राहुल नार्वेकर यांनी बदललेलं आहे. एखाद्याला उत्तम दूरदृष्टी असेल तर, कसा बदल घडू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल नार्वेकर. नार्वेकर यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. हे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाईल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

यावर राहुल नार्वेकर यांनी देखील प्रतिऊत्तर दिलंय. माझ्यासाठी देखील बरं जाईल, अशा शब्दात त्यांनी मिश्किल प्रतिऊत्तर दिलंय. त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच हशा पिकला होता.

समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू

अलीकडे वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे,आपल्या समाजातील आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर, दुसऱ्यांना अपशब्द वापरणं ही पद्धत सुरू आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केलीय.अश्या व्यक्तीला समाज डोक्यावर घेतो आणि तो व्यक्ती समाजाचा नेता होतो,हे दुर्दैव देशात पाहायला मिळत आहे. अशी खंत देखील यावेळी पाटलांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT