भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुरु केलेल्या शिवस्वराज्य यात्रेत पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना टळलीय. क्रेनमधून शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या नेत्यांची क्रेन कलली. मात्र कोल्हे, पाटील थोडक्यात वाचले. जुन्नरमध्ये नेमकं काय घडलं? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....
विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केलीय. मात्र या यात्रेच्या सुरूवातीलाच मोठा अनर्थ होण्यापासून टळला. त्याचं झालं असं की.शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जयंत पाटील, रोहिणी खडसेंसह खासदार अमोल कोल्हे आणि मेहबुब शेख क्रेनच्या ट्रॉलीत बसले आणि ट्रॉली वरती गेली.
त्यांनी शिवरायांना पुष्पहार अर्पण केला...त्यानंतर हे सर्व क्रेननं खाली येत होते, मात्र अचानक क्रेनमध्ये बिघाड झाला.सर्वच जण जीव मुठीत घेऊन क्रेनला घट्ट पकडून होते. मात्र क्रेन थोडीशी कलल्यामुळे चौघांचाही तोल गेला. जयंत पाटील सर्वात मागे असल्यामुळे त्यांची चांगलीच हालत झाली, मात्र सर्व जण क्रेनमधून सुखरूप खाली आले आणि मोठा अनर्थ टळला.
मात्र या अपघातात खासदार अमोल कोल्हेंच्या हाताला दुखापत झालीय. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या विधासनभा निवडणुकीचे वारे वाहतायत, त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते सभा, सोहळे आणि रॅल्या काढतायत. काही ठिकाणी महापुरूषांच्या उंच पुतळ्यांना अभिवादनही करतात. मात्र यावेळी सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.