Jayant Patil’s meetings with Devendra Fadnavis and Eknath Shinde fuel speculation of a major political shift in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार? फडणवीस-शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक

Maharashtra Political Buzz: राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे... पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या फडणवीस आणि शिंदे भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. या भेटींमागे नेमकं काय दडलंय? अर्थमंत्रिपदाबाबत शिंदेंनी काय भूमिका घेतलीय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Suprim Maskar

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळतायत..आणि याला कारण ठरलंय...शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांच्या महायुतीतील नेत्यांसोबतच्या भेटीगाठी...14 जुलैला जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षावर भेट घेतली...आणि अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 16 जुलैला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड अर्धातास चर्चा झाली..विशेष म्हणजे या दोन्ही बैठका रात्री उशीरा झाल्यानं काळोखात काही तरी मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगू लागलीय. शरद पवारांची राष्ट्रवादी NDAमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अर्थमंत्रिपदाची माळ जयंत पाटलांच्या गळ्यात पडणार असल्याचं बोललं जातंय. त्यात ठाकरेसेनेनं आणि राष्ट्रवादीनं या चर्चांना केराची टोपली दाखवली असली तरी काँग्रेसनं मविआत अस्वस्थता असल्याचं मान्य केलयं...

दरम्यान दादांच्या राष्ट्रवादीकडे अर्थमंत्रिपद जाऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्याचं सांगितलंय जातंय....त्यामुळे अर्थमंत्रीपदावरून महायुतीतही अंतर्गत संघर्ष सुरु असल्याचं दिसतंय. मात्र दादांच्या राष्ट्रवादी अर्थमंत्रिपदासाठी आग्रही राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय.

सध्या सुरू असलेल्या भेटीगाठींना विकासकामांचा रंग दिला जातोय. मात्र सत्तेची नवी समीकरणं जुळवण्यासाठी पडद्यामागून काही हालचाली सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जयंत पाटलांची वर्षा आणि नंदनवनवारीचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतात हे आगामी काळातच स्पष्ट होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT