चंद्रकांत पाटलांना सरकार पडण्याची स्वप्नं पडतात - जयंत पाटील  SaamTvnews
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना सरकार पडण्याची स्वप्नं पडतात - जयंत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विधाने फार मनावर घेऊ नयेत, त्यांना स्वप्नात सुद्धा महाविकास आघाडी सरकार पडेल अशीच स्वप्नं पडतात. असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Krushnarav Sathe

सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विधाने फार मनावर घेऊ नयेत, त्यांना स्वप्नात सुद्धा महाविकास आघाडी सरकार पडेल अशीच स्वप्नं पडतात. त्यामुळे प्रसिध्दीसाठी त्यांच्या सुरू असलेल्या टीकांना उत्तर देणे आता आम्हाला फारसं शक्य होणार नाही. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला रोज बदनाम करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने हातात घेतला आहे, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला आहे.

हे देखील पहा :

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आर्यन खान ड्रेस प्रकरणी आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत आता फारसं मनावर तुम्ही घेऊ नका ते त्यांचं कामच आहे. वाद निर्माण करून माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर सतत प्रतिक्रिया देणे आता शक्य होईल असं वाटतं नाही.

समीर वानखेडे यांच्या बाबतीत बोलताना पाटील म्हणाले, मंत्री नवाब मालिक यांच्याकडून समीर वानखडे यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने घटनाक्रम सादर करण्यात येत आहे. तर ड्रग्ज छाप्यात साक्षीदाराने मोठ्या रकमेचे ब्लॅकमेलिंग करण्याचं सांगितल्याचे आता पुढे आले आहे. यामध्ये भाजपा समर्थक सहभागी असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले आहे, त्यामुळे हे सर्व प्रकरण लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे.

समीर वानखेडे यांच्या मुस्लिम असल्याबाबतची कागदपत्रे नवाब मलिक यांच्या कडून सादर करण्यात आली आहे आणि ते जर खरे असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. चुकीच्या पद्धतीने सरकारी सेवेत जर कोणी आले असेल तर याबाबत ही पाऊले उचलावी लागतील असं मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra Rail Update: केंद्राचा महाराष्ट्राला गीफ्ट, दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT