Jayadatta Kshirsagar Saam TV
महाराष्ट्र

Beed Political News : 'सगळं दिलं, पण आता रक्ताचं नातं संपलं...', बंडखोर पुतण्यांविरोधात जयदत्त क्षीरसागर आक्रमकपणे मैदानात

Jaydatta Kshirsagar News : राजकीय पक्ष म्हणजे आता '800 खिडक्या 900 दारं' अशी झाली आहेत.

विनोद जिरे

Beed News :

अगोदर संदीप क्षीरसागर आणि आता योगेश क्षीरसागर या पुतण्यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांनी साथ सोडत बंड केलं आहे. मात्र बंडानंतर आता काका जयदत्त क्षीरसागर आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. आगामी निवडणुका पूर्ण ताकतीने लढायच्या आहेत.

तुम्ही साथ द्या, मी तुम्हाला शक्ती देईल, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी शहर आणि गाव खेड्यात बैठक आणि मेळावे घेऊन कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रत्येक आवाहनाला कार्यकर्त्यांनी देखील टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

जयदत्त क्षीरसागर यांनी पुढे म्हटलं की, राजकीय पक्ष म्हणजे आता '800 खिडक्या 900 दारं' अशी झाली आहेत. त्यामुळे एवढी संभ्रमाची अवस्था आहे की दहा फुटावरचं आता दिसणं मुश्किल झालं आहे. कोण कुठे जाईल आणि कोण कोणाला भेटेल? हे सांगता येत नाही. (Political News)

जयदत्त क्षीरसागर लवकरच निर्णय घेणार

त्यामुळे काही दिवस आपण शांत आहोत. हा उडालेला फुफाटा जोपर्यंत खाली बसत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढे काय चाललंय हे स्पष्ट दिसणार नाही. एकदा हा फोपाटा खाली बसला की आपण निर्णय घेऊ, असं म्हणत आपण लवकरच निर्णय घेणार असल्याचे संकेत क्षीरसागर यांनी दिले आहेत. (Latest Marathi News)

रक्ताचं नातं संपलं

पुतण्याच्या बंडावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. रक्ताचं नातं संपलं. मुलाला बाजूला ठेवून दोन्ही भाऊ, त्यांची मुलं, त्यांच्या पत्नी यांना संधी देऊन सर्व केलं. कुटुंबप्रमुख म्हणून ते माझं कर्तव्य होतं. काकूंनी सांगितलं होतं एक शहरात आणि एक ग्रामीण भागात ठेऊन काम करायचं. मी तसं ठेवायचा प्रयत्न केला मात्र आता इन्स्टंटचा जमाना आहे, असं म्हणत जयदत्त क्षीरसागर यांनी बंडखोर भाऊ आणि पुतण्यांवर निशाणा साधला.

मी तुम्हाला पूर्ण शक्ती मी देईन

दरम्यान आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये मी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभा राहणार आहे. मी तुम्हाला पूर्ण शक्ती मी देईन, असं आवाहन करत जयदत्त क्षीरसागरांनी आता शहर आणि गाव खेड्यातील कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण आता अधिकच तापत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT