jat villagers demands water from mhaisal project  saam tv
महाराष्ट्र

Mhaisal Water Project : म्हैसाळच्या पाण्यासाठी जत ग्रामस्थ उभारणार अनाेखे आंदाेलन

गेली अनेक वर्ष पाण्यासाठी संघर्ष सुरु असल्याची माहिती आंदाेलकांनी दिली.

विजय पाटील

Sangli News :

जत पुर्व भागातील 65 गावांना म्हैसाळचे पाणी द्या अन्यथा म्हैसाळच्या (mhaisal) पाण्यासाठी रक्त घ्या पण पाणी द्या अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती तुकारामबाबा महाराज यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. या अभियान बाबतचे निवेदन नुकतेच सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. (Maharashtra News)

सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळी तालुका आहे. आजपर्यंत टँकर आणि चारा टंचाई वर अब्जावधी रुपये खर्च झाले. सन 1988 पासून जतला म्हैसाळचे पाणी द्यावे यासाठी संघर्ष सुरु आहे. पण 2024 उजाडले तरी पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

तीन पिढ्या मातीत गेल्या पण शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. अनेक संघटनांनी आंदोलन केले. तसेच श्री. संत बागडेबाबा मानव मित्र संघटना समितीच्या माध्यमातून पाण्यासाठीचा लढा सुरुच आहे. सन 2019 ला पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली. त्यावेळी शासनाने जतला दयाला पाणीच नाही असे सांगितले. यामुळे खरी परिस्थिती जतकरांना कळाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रक्त घ्या पण पाणी द्या अभियान

सन 2019 मध्ये शेजारील मंगळवेढा तालुक्यात पाणी गेले पण जत पूर्व भागातील पुर्णत 48 गावे अर्थत 17 गावे अशी 65 गाये आजही पाण्यापासुन वंचित आहेत. या जत पुर्व भागातील 65 गावांना म्हैसाळचे पाणी द्या अन्यथा म्हैसाळच्या पाण्यासाठी" रक्त घ्या पण पाणी द्या अभियान राबवण्यात येणार असल्याचे तुकारामबाबा महाराज यांनी सांगितले. त्याबाबतचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे असेही तुकारामबाबा महाराज यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT