सातारा : कोरेगाव (koregoan) तालुक्यातील जरंडेश्वर कारखाना (jarendeshwar sugar factory) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिलेला आहे. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या (kirit somaiyaa) या भाजप नेत्यांनी या कारखान्याला भेट देऊन सभासदांना न्याय मिळवून देईल अशी भूमिका घेतली होती. हा कारखाना नेहमीच राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर होणाऱ्या टीकेमुळे चर्चेत राहिलेला आहे. (jarendeshwar sugar factory latest marathi news)
निवडणूक आली की या कारखान्याकडे प्रचाराचे साधन म्हणून पाहिले जाते परंतु आता या कारखान्याचा हंगाम चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या (farmers) काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये जरंडेश्वर शुगर मिल चिमणगाव कोरेगाव गट नंबर ९४४ विसापूर मधील एक हेक्टर नऊ आर क्षेत्रातील नवीन ऊस लागण १४ नाेव्हेंबर २०२० उसाची जात 10001 हे दाेन एकर केलेले आसताना पुसेगाव ऑफिसमधील शेतकी अधिकारी व संबंधित त्या विभागाचा चिट बॉय एकरी ५०० रुपये मानधन गुपचुप खातेदाराकडून घेतो. २०० रुपये चीट बॉय आणि ३०० रुपये शेतकी अधिकारी हे गुपचुप उसाच्या शेतकऱ्याकडून घेतात हे शेतकरी यांचा संवाद व्हायरल हाेऊ लागला आहे.
डिसेंबर २०२० जानेवारी २०२१ ची तोड आता चालू आहे असे व्यवहार पुसेगाव ऑफिसमध्ये चालू असल्यामुळे ऊस लागण नोव्हेंबर २०२० ला नोंद केलेला ऊस तोडी विना शिल्लक राहिला आहे. अखेरीस या सगळ्या गोष्टींना कंटाळून गोपुज कारखाना वडूज यांना ऊस दिला जात आहे.
दरम्यान जरंडेश्वर शुगर कारखाना हा कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असताना केवळ चीट बॉय आणि काही अधिकारी यांच्यामुळे सभासदांना होणाऱ्या त्रासाबद्दल कारखाना प्रशासन आता या वर नेमकी काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.