Raj Thackeray Saam Digital
महाराष्ट्र

Raj Thackeray : 'जरांगेंआडून पवार-ठाकरेंचं राजकारण', राज ठाकरेंचा ठाकरे-पवारांवर निशाणा

Raj hackeray On Uddhav Thackeray : जारंगे पाटलांच्या आडून ठाकरे-पवारांचं राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं पवार म्हणतात, याचा अर्थ त्यांना दंगली घडवायच्या आहेत का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.

Tanmay Tillu

जारंगे पाटलांच्या आडून ठाकरे-पवारांचं राजकारण सुरू असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं पवार म्हणतात, याचा अर्थ त्यांना दंगली घडवायच्या आहेत का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय. राज ठाकरेंनी काय घणाघात केलेत पाहूया...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निव़णुकीचा आढावा घेण्यासाठी मराठावाड्याच्या दौरा केला खरा...मात्र हा दौरा दुस-याच कारणासाठी गाजला...दौ-याच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत विधान केलं आणि मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. राज ठाकरे जिकडे गेले तिकडे कधी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला तर कधी त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. कधी घोषणाबाजी झाली तर कधी गोंधळ घातला गेला. मात्र हे आंदोलन करणारे दुसरे तिसरे कुणी नसून ठाकरे आणि पवारांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरे केवळ एवढा दावा करून थांबले नाहीत तर जरांगेंआडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत असल्याचा निशाणा साधला. एवढंच नव्हे तर विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात दंगली घ़डणार असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. हा आरोप करातना त्यांचा रोख उद्धव आणि पवारांकडेच असल्याचं दिसतंय. मात्र असं असलं तरी राज ठाकरेंनी मराठवाड्याच्या दौ-याच्या समारोपातही सुरूवातीला मांडलेली आरक्षणाची गरज नसल्याची भूमिकेचा पुनरूच्चार केला.

राज ठाकरे एकला चलोच्या भूमिकेत आहेत. आणि त्यांचं मुख्य टार्गेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचे संकते त्यांनी मराठवाड्याच्या दौ-यात दिलेत. कारण निवडणुकीत विरोधक जिंकत नसतो तर सत्ताधारी हारतो असं म्हणणारे राज ठाकरे मात्र विरोधकांवर निशाणा साधतायत. त्यामुळे राज ठाकरे खरंच स्वबळावर लढतायत की महायुतीसाठी नरेटीव्ह सेट करुन मैदान सुपीक करतायत...असा सवाल उपस्थित होतोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना मिळेल दिलासा

Maharashtra News Live Update: पंढरपूर माळशिरस तालुक्याला पावसाने झोडपले

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT