Crime News Saam tv
महाराष्ट्र

'आमच्या लेकीचा जीव घेतला', विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्यांवर वडिलांचा आरोप | Jalna

Womans Death in Jalna Sparks Tension Police Investigate: जालना जिल्ह्यातील बाजीउम्रद गावात एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा अनिल पवार (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जळगावात विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची बातमी ताजी असतानाच जालन्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासापासून विवाहित महिलेनं टोकाचं पाऊल उचलले असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पूजा अनिल पवार (वय वर्ष ३२) असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा पवार ही आपल्या सासरच्या मंडळींसोबत जालना जिल्ह्यातील बाजीउम्रद गावात राहत होती.या महिलेटचं लग्न अनिल पवार यांच्याशी सुमारे दहा वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या लोकांकडून तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप पूजाच्या वडिलांनी केला आहे.

पूजाच्या वडिलांनी असाही आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी पूजाला काहीतरी विषारी पदार्थ खाऊ घातल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सासरच्यांची चौकशी केली जात आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पूजाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? आत्महत्या आहे की हत्या? पूजाच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे बाजीउम्रद गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT