कालव्यात हातपाय बांधलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने जालन्यात खळबळ! Saam Tv
महाराष्ट्र

कालव्यात हातपाय बांधलेला अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने जालन्यात खळबळ!

अज्ञात व्यक्तींनी तरुणाचा हातपाय बांधून खून करून मृतदेह वाहत्या पाण्यात फेकून दिला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : अंबड तालुक्यातील भार्डी शिवारात जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात एका अनोळखी ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह दोरी आणि रुमालाने हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह (Death Body) कालव्या बाहेर काढून गोंदी पोलीस (Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अज्ञात व्यक्तींनी तरुणाचा हातपाय बांधून खून (murder) करून मृतदेह वाहत्या पाण्यात फेकून दिला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. सदर वर्णनाच्या व्यक्तीबाबद कुणाला माहिती असल्यास गोंदी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन गोंदी पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

Maharashtra News Live Update: कॅप राऊंडबाहेर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अभाविपचे आंदोलन

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT