Jalna CCTV Video Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: तरुणानं भरचौकात स्वत:ला पेटवून घेतलं, घटना CCTV मध्ये कैद; नेमकं कारण काय?

Jalna youth sets himself on fire: जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेतल्याची घटना घडली. तरुण ५० टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Priya More

अक्षय शिंदे, जालना

जालन्यात एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील वाटुर फाटा येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून त्याने स्वतःला जाळून घेतल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखणी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेतल्याची घटना घडली आहे. प्रल्हाद भगस असं स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. प्रल्हादने शनिवारी रात्री १० च्या सुमारास जालन्यातील वाटुर फाटा येथे ही घटना घडली आहे.

प्रल्हादने रस्त्यावर पळत असताना स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी भडका उडला. काही तरुणांनी धावत प्रल्हादला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने स्वत:ला पेटवून घेतलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

गावातील व्यापाऱ्यासोबत झालेल्या पैशाच्या वादातून प्रल्हादने स्वत:ला पेटवून घेत टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. दरम्यान या आगीमध्ये प्रल्हाद जवळपास ५० टक्के भाजला. काही तरुणांनी जखमी अवस्थेत प्रल्हादला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात सध्या प्रल्हादवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT