Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : तलाठ्याला जालन्यात बेदम मारहाण, अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात कारवाईवेळी राडा

Jalna News : जालन्यात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करण्यात आली. आरोपींना अटक न केल्याचा आरोप करत तलाठी संघटनेने गौण खनिज काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

  • अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईदरम्यान तलाठ्याला मारहाण

  • मौजपुरी पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल

  • आरोपींना अटक न केल्याचा तलाठी संघटनेचा आरोप

  • अटक न झाल्यास गौण खनिज काम बंद आंदोलनाचा इशारा

अक्षय शिंदे, जालना

जालन्यातील बापकळ परिसरात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला मारहाण करण्यात आली आहे याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र पोलिस आरोपींना अटक न करता आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप तलाठी संघटनेने केला आहे.आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत तलाठी संघटनेने जालना तहसीलदारांना निवेदन देखील दिलं आहे. दरम्यान पुढील दोन दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास तलाठी संघटना गौण खनिज काम बंद आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

तलाठ्याला बापकळ शिवारात झाली मारहाण

गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चापट बुक्क्यांनी मारहाण करून वाहने पळवून नेल्याची घटना जालना तालुक्यातील बापकळ परिसरात घडली आहे.या प्रकरणात हिवरा रोशनगावचे तलाठी पंकज ढाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सावंत आणि रियाज सय्यद अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

गौण खनिज काम बंद करण्याचा इशारा

जालना जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना वाढत आहे. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण तयार झाल असून शासनाची कर्तव्य बजेत असताना, मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असल्याची भावना महसूल कर्मचाऱ्यांमध्ये आहे. दरम्यान या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यामुळे, तलाठी संघटनेने तहसीलदारांना निवेदन देऊन पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत असल्याच म्हटल आहे. तर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आरोपींना अटक न केल्यास तलाठी संघटना गौण खनिज काम बंद आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : २०० फूट खोल दरी, उंच कातळभिंती अन् अंधारलेली वाट; मुंबईजवळ लपलंय 'हे' रहस्यमय ठिकाण

Maharashtra News Live Update: सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख

Lack of sleep: 8 तासांपेक्षा कमी झोप घेताय? हे गंभीर आजार होण्याचा वाढतो धोका

Veen Doghatli Hi Tutena : राजवाडेंचा रोमँटिक अंदाज अन् कँडल लाईट डिनर डेट; समर देणार स्वानंदीला गोड सरप्राईज, VIDEO एकदा पाहाच

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT