Jalna SRPF 28 year old soldier hanging himself at his residence latest news update  Saam TV News
महाराष्ट्र

SRPF जवानाचा टोकाचा निर्णय, राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं

SRPF Jawan Dies by Suicide in Jalna : जालना शहरातील पोलीस वसाहतीत एसआरपीएफ जवान पुरुषोत्तम खेडेकर याने आत्महत्या केली. पोलिसांकडून कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

jalana Crime News Update : जालन्यात राहत्या घरी एसआरपीएफ जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुरुषोत्तम खेडेकर अस २८ वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, मात्र कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय.

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या २८ वर्षीय एसआरपीएफ जवान पुरुषोत्तम खेडेकर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम खेडेकर हे एसआरपीएफमध्ये कार्यरत होते आणि त्यांच्या आत्महत्येमुळे सहकाऱ्यांसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिस विविध दिशांनी तपास करत आहेत.

या घटनेने पोलीस वसाहतीत शोककळा पसरली आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेतली असून, लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ

जालन्यात राहत्या घरी एका एसआरपीएफ जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या एसआरपीएफ जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे..

कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

जालन्यात राहत्या घरी एका एसआरपीएफ जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या एसआरपीएफ जवानाने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर येऊ शकल नाही. मात्र कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

SCROLL FOR NEXT