रावसाहेब दानवे SaamTv
महाराष्ट्र

काँग्रेसने 'सांड' या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला; राहुल गांधींवरील टीकेनंतर दानवेंचे घुमजाव

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांना सांड म्हटले होते.

लक्ष्मण सोळुंके

जालना : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्यांना सांड म्हटले होते. दरम्यान या वक्तव्याबाबत दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सांड या शब्दाचा अर्थ काँग्रेस नेते काहीही घेत असून, माझ्या वक्तव्याचा ते विपर्यास करत आहेत. तसेच तो काँग्रेस वाल्यांचा जुना धंदा आहे, अशी सारवासारव दानवे यांनी केली आहे.

हे देखील पहा -

दानवेंच्या त्या वक्तव्यांनंतर राज्यभरातून काँग्रेसकडून दानवेंचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला 'जोडा मारो' आंदोलन देखील काँग्रेसने केले आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा काल जालन्यातील बदनापूरमध्ये पोहचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राहुल गांधी सांड असून कोणत्याच कामाचे नाही असं म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. लोक जनावरं जशी देवाला सोडतात त्यानंतर ती जनावरं कोणत्याच कामाला चालत नाही तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधान पदासाठी निष्क्रिय असल्याचं दानवे यांनी म्हटलं होत.

दरम्यान दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आज जालन्यातील गांधींचमन चौकात रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रावसाहेब दानवे यांची जन आशीर्वाद यात्रा बेताल वक्तव्य करण्यासाठी आहे का? असा सवाल करत दानवे यांनी बेताल वक्तव्य करणं थांबवावे अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

Success Story: नासामधील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली, यूपीएससी दिली; पाचव्या प्रयत्नात IPS; अनुकृति शर्मा यांचा प्रवास

White Tongue: जीभ पांढरी दिसतेय? दुर्लक्ष करू नका; वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

Chanakya Niti: या ५ ठिकाणी थांबलात तर आयुष्य थांबेल; चाणक्यांनी सांगितलेले मार्ग डोक्यात फिट्ट करून घ्या!

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT