Jalna Rajur Road Accident SaamTv
महाराष्ट्र

Jalna Accident : फिरण्यासाठी घराबाहेर पडले, पुन्हा परतलेच नाही; 'त्या' तरुण-तरुणींसोबत नेमकं काय घडलं?

Jalna Accident: जालन्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील २ जण जागीच ठार झाले आहेत. राजुर रोडवरील बावणे पांगरी शिवाराजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : जालन्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या बावणे पांगरी शिवाराजवळ घडलीय. जालना राजुर रोडवरील बावणे पांगरी शिवारात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय. प्रशांत पवार (वय २४) आणि निकिता राठोड (वय २३) अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

प्रशांत आणि निकिता हे दोघे दुचाकीने राजूरहून जालन्याच्या पारेगावकडे निघाले होते. यादरम्यान बावणे पांगरी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनंतर दोन्ही मयतांचा मृतदेह स्थानिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. मयत निकिता राठोड ही मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एका बाईकवर निकिता आणि प्रशांत हे दोघे होते, त्यांच्यासोबत एक मुलगी आणि मुलगा हे दुसऱ्या बाईकवर होते. अद्याप त्या दोघांची माहिती समोर आलेली नाहीय. या भीषण अपघातात प्रशांत आणि निकिता या दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT