Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खासगी क्लास संचालकाला अटक

Jalna Crime News: राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. कल्याणचं प्रकरण ताजे असतानाच जालन्यात लग्नाचे आमिष दाखवून एका खासगी क्लास संचालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. कल्याणचं प्रकरण ताजे असतानाच जालन्यात लग्नाचे आमिष दाखवून एका खासगी क्लास संचालकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. तब्बल वर्षभर आरोपीनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर, मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसंच पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

जालन्यात कुंभारी पिंपळगाव येथील एका खाजगी क्लासच्या संचालकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय. लग्नाचे आमिष दाखवून तब्बल वर्षभर त्यानं मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती आहे. आसाराम राऊत असं संशयित आरोपीचं नाव असून, त्यानं अल्पवयीन मुलीवर तब्बल वर्षभर अत्याचार केला. ही धक्कादायक माहिती पीडित मुलीच्या कुटुंबाला समजल्यानंतर, मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी आसाराम राऊत याला ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान कुंभारी पिंपळगाव येथे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, परिसरातील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी आसाराम याला अटक करण्यात आलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT