Ajit Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Jalna Politics: जालन्यात काँग्रेसकडून अजित पवारांना झटका, जवळच्या नेत्याने सोडली साथ

Congress Gains Strength in Jalna: जालन्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे. काँग्रेसने अजित पवारांना मोठा धक्का दिला. एका बड्या नेत्याने अजित पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • जालन्यात अजित पवार गटाला मोठा धक्का

  • राष्ट्रवादी शहराध्यक्ष अब्दुल रशीद यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

  • महानगरपालिका निवडणुकीपूर्वी जालन्यात काँग्रेसची ताकद वाढली

अक्षय शिंदे, जालना

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरूच आहे. अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाची साथ सोडत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशामध्ये जालन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अब्दुल रशीद यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये आज अब्दुल रशीद यांचा काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला.

आगामी महानगरपालिका निवडणुकींपूर्वी अब्दुल रशीद काँग्रेसमध्ये आल्याने जालन्यामध्ये काँग्रेसची ताकद आता वाढणार आहे. तर अब्दुल रशीद यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केल्यानंतर जालना महानगरपालिकेला पहिला महापौर काँग्रेस पक्षाचा होणार असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT