Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर; जालना- वडिगोद्री महामार्गावरील प्रकार

Jalna News : जालना ते वडीगोद्री महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघात झाल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहे.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : केंद्र सरकारकडून महामार्गाचे काँक्रेटीकरण किंवा डांबरीकरण करण्यासाठी निधी दिला जात असतो. याचे कंत्राट दिले जात असते. मात्र कंत्राटदारांकडून चांगले काम केले जात नसल्याचे काही महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडत असतात. अशाच प्रकारे जालना ते वडीगोद्री महामार्गावर मोठे खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेल्या (Jalna News) जालना ते वडीगोद्री महामार्गावर पुलावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदाराकडून चक्क मातीचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना ते वडीगोद्री महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघात झाल्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहे. अशातच पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली माती टिकाव धरेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महामार्गावर २४ तास वर्दळ 

दरम्यान सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू असल्याने याच मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ २४ तास सुरू असल्याने बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराने खडी आणि डांबर टाकून हे खड्डे बुजविणे अपेक्षित होते. मात्र रस्त्याच्या कडेलाच असलेली माती या ठिकाणी टाकल्याचा प्रकार समोर आला. 

महिनाभरात सात अपघात 

जालना ते वडीगोद्री या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने गेल्या महिन्याभरामध्ये जवळपास सात दुचाकीस्वरांचे अपघात या रस्त्यावर झाले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू असून या भागांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर देखील मोठ्या प्रमाणात धावत आहे. या खड्ड्यामुळे अपघात झाल्यास कोण जबाबदार असा सवाल केला जात आहे. 

ही तर डोळ्यात धुळफेक
जालना ते वडीगोद्री प्रवासा दरम्यान रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक प्रवाशांच्या गाडीला अपघात होऊन गंभीर दुखापत झालेली आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविणे खुप गरजेचे होते. परंतु खड्ड्यात रस्त्याच्या कडेची माती टाकून खड्डे बुजविले जातील; असे वाटले नव्हते. मात्र असा प्रकार होत असल्याने हे तर डोळ्यात धूळफेक करण्यासारखेच आहे. अशी प्रतिक्रिया वडीगोद्री येथील ग्रामस्थ धीरज वायाळ यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT