Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : जालना तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक; मराठा आंदोलक आक्रमक

Jalna News : जालना तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक; मराठा आंदोलक आक्रमक

Rajesh Sonwane

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. बीड जिल्ह्यात बसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्यानंतर आज (Jalna News) जालना तालुक्यातील रामनगर परिसरात (Maratha Aarkshan) तहसीलदार छाया पवार यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला असून या आंदोलनाला हिंसक वळण मिळू लागले आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होण्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. आरक्षणासाठी (Maratha Reservation) गावागावात मराठा आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. नेत्याबरोबरच आता प्रशासनाचा विरोधातही मराठा समाजाचा आक्रोश वाटताना दिसत आहे. बीड जिल्ह्यात बसवर दगडफेक व बस जाळण्याचे प्रकार घडले आहेत. यानंतर आज शासकीय अधिकारी असलेल्या महिला तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गावात प्रवेश करण्यास केला विरोध 

तहसीलदार छाया पवार या आपल्या कामानिमित्त महसूल विभागाच्या शासकीय वाहनातून जात असताना मराठा समाजाच्या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार यांना गावात प्रवेश करण्यास विरोध केला. मात्र तहसीलदार वाहनातून गावाकडे जात असताना संतप्त झालेल्या आंदोलकांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राघव चड्ढांची आपनेच केली बोलती बंद! राज्यसभेतलं पदही काढून घेतलं; दिल्लीच्या राजकारणात खळबळ

Jay Pawar Education: जय पवारांची राजकारणात अधिकृत एन्ट्री; जाणून घ्या त्यांचं शिक्षण किती झालंय?

Coconut water sweetness: फिकट की गडद? शहाळ्याचा रंगच सांगतो पाणी गोड आहे की नाही

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

Ravi Varma Painting: पुण्यातील उद्योगपतीनं खरेदी केली १६७ कोटींची पेटिंग, नेमकं खास काय आहे?

SCROLL FOR NEXT