Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident: दुचाकीस्वाराला वाचविताना एसटीचा अपघात; पाच प्रवाशी जखमी

लक्ष्मण सोळुंके

जालना : यवतमाळहून संभाजीनगरकडे प्रवाशी घेऊन निघालेली बस रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडून अपघात (Accident) झाला. समोरून येत असलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी (Jalna) बस चालकाने रस्त्याखाली बस उतरविल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार ते पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. (Live Marathi News)

जालना शहरापासून जवळ असलेल्या जालना देऊळगाव - राजा महामार्गावर कन्हैयानगर जवळ महामंडळाच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. ५२ प्रवाशी घेऊन छत्रपती संभाजीगर आगाराची बस यवतमाळहुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना ही घटना घडली. महामार्गावर समोरून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला वाचवताना एसटी चालकाने बस रोडच्या खाली घेतल्याने हा अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात चार ते पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. 

वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला 

घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संकटकालीन दरवाजातून बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. यात चार ते पाच जखमीना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने दुचाकीस्वराला वाचताना बस रस्त्याच्या खाली उतरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात अडकल्याने कुठलाही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ५२ प्रवाशापैकी दहा ते पंधरा प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT