Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: रेल्वे स्थानक परिसरात सहा तलवारी जप्त; दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात

रेल्वे स्थानक परिसरात सहा तलवारी जप्त; दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून शस्‍त्र बाळगणाऱ्या व्यक्तीच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत (Jalna News) चाललीय. या दरम्‍यान स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाला रात्रीच्‍या सुमारास रेल्‍वेस्‍थानक परिसरात तलवारी आणणारे आढळून आले. त्‍यांच्‍याकडून सहा तलवारी जप्‍त केल्‍या आहेत. (Maharashtra News)

जालना शहरात शस्‍त्र बाळगून असलेल्‍यांमध्‍ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याचे दिले होते. यानंतर पथकाला रात्री नऊच्या सुमारास जालना रेल्वे स्थानकात नांदेड शहरातून काही जण तलवारी आणण्यासाठी गेले होते. ते तलवारी घेऊन शहरात दाखल होत असल्‍याची महिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी (Railway) रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला.

दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

विद्युत कॉलनीकडे जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याजवळ सहा तलवारी आढळून आल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या तलवारी जप्त केल्‍या. याप्रकरणी गोकुळसिंग कायटे व गोपाल गोसिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अभिजीतसिंग बादलसिंग टाक, सतनामसिंग शेरासिंग टाक या दोघांविरुद्ध अवैधरित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT