Jalna News Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Jalna Bribe Case: ३२ हजारची लाच घेताना सरपंच अटक; देयकावर सही करण्यासाठी मागितली होती रक्‍कम

Sarpanch Arrested For Taking Bribe: ३२ हजारची लाच घेताना सरपंच अटक; देयकावर सही करण्यासाठी मागितली होती रक्‍कम

लक्ष्मण सोळुंके

जालना : जिल्हा परिषद शाळेच्या चार खोल्याचे बांधकाम करणाऱ्या गुतेदाराला बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायत (Grampanchayat) खात्यात कामाचे चार लाख रुपये बिल आले होते. हे बिल देण्यासाठी देयकावर सही करण्यासाठी ८ टक्‍क्यांप्रमाणे ३२ हजाराची लाच (Bribe) घेताना सरपंचला पंचासमक्ष अटक केली. ही घटना परंतुर तालुक्यातील रोहिणा बुद्रुक गावात घडलीय. (Latest Marathi News)

जसाराम आसाराम तुंभारे असे या अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. रोहिणा बुद्रुक गावात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चार खोल्याचे बांधकाम करण्याची मंजुरी मिळाली होती. सदरील काम पूर्ण झाल्यानंतर गुतेदरांनी इस्टिमेटप्रमाणे बांधकाम विभागात सादर केले. यानंतर बांधकाम विभागाने बिल मंजूर करून कामाची पूर्ण देयक ग्रामपंचायत खात्यात वर्ग केले होते. दरम्यान या कामाचे देयक (Jalna News) मिळण्यासाठी गुत्तेदाराने रीतसरपणे ग्रामसेवक यांच्याकडे मागणी केली होती. ग्रामसेवकाने चार लाखाचे देयक तयार करून त्यावर सही केली. मात्र या देयकावर सही करण्यासाठी सरपंच जसाराम आसाराम तुंभारे यांनी गुत्तेदाराकडे आठ टक्के प्रमाणे बत्तीस हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

गुत्‍तेदाराने केली तक्रार

गुत्तेदारालाही लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. विभागाने लाच मागणीबाबत पडताळणी केली असता सरपंच तुंभारे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून पंचासमक्ष सरपंचाला बत्तीस हजाराची लाच घेताना पंचायत समिती कार्यालय परतूर येथील रोडवर अटक केली. सरपंचाविरुद्ध परतुर पोलीस ठाण्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्या एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT