Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : पडळकरांवर चप्पल फेकीचा निषेध; अंबडमध्ये दुकानावर दगडफेक, महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको

Gopichand Padalkar : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे

लक्ष्मण सोळुंके

जालना : गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या घटनेनंतर आज अंबड शहरांमध्ये (Jalna) धनगर समाजाच्यावतीने अचानक बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या आव्हानादरम्यान काही दुकान सुरू असल्याने या दुकानावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तर शिरनेर गावात (Ambad) अंबड -पैठण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको करण्यात आले. 

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या हल्ल्याच्या निषेधार्थ धनगर समाज आक्रमक झाला आहे. या घटनेचे पडसाद उमटू लागले आहेत. चप्पल फेकीच्या या घटनेमुळे काहीकाळ शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्याकडून दुकान बंद करण्याचे आव्हान केले जात असताना हुल्लडबाज कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फिकीचे घटनेने पुन्हा एकदा धनगर समाज आक्रमक झाला आहे.

अंबड -पैठण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको

या घटनेचे पडसाद उमटत असून आज सकाळी शिरनेर गावात अंबड -पैठण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन  करत धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर अंबड- पैठण महामार्गावरील शिरनेर गावात धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे, यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रत्यावर टायर जाळून सकाळ पासून रस्ता रोको आंदोलनास सुरवात केली आहे. त्यामुळे काही काळ या परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT