Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : प्रियांक खर्गे यांचा प्रतिकात्मक जाळला फोटो; सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध

Jalna News : कर्नाटक विधानसभातून सावरकरांचं तैल चित्र काढण्याची मागणी प्रीयांक खर्गे यांनी केली होती. सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध केला जात

लक्ष्मण सोळुंके

जालना : कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खार्गे यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जालन्यात (BJP) भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाली. शहरातील (Jalna) सावरकर चौकात भाजप युवा मोर्चाच्यावतीने प्रियांक खर्गे यांच्या फोटोला जोडे मारून खर्गे यांचा प्रतीकात्मक फोटो जाळून तीव्र निदर्शने करण्यात आली. (Maharashtra News)

कर्नाटक विधानसभातून सावरकरांचं तैल चित्र काढण्याची मागणी (Congress) प्रीयांक खर्गे यांनी केली होती. सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध केला जात असून राज्यभरात भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार जालन्यात देखील सावरकरांच्या अवमानाविरोधात भाजप युवा मोर्चाची तीव्र निदर्शने करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सावरकरांच्या अवमानाविरोधत जालन्यात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शहरातील सावरकर चौकात प्रियांक खर्गे यांच्या फोटोला जोडे मारून व त्यानंतर खर्गे यांचा प्रतीकात्मक फोटो जाळून त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT