Mobile Blast Saam tv
महाराष्ट्र

Mobile Blast: मोबाईल बॅटरीचा भयंकर स्‍फोट; स्‍फोटात मुलाच्या हाताची सर्व बोट गळून पडली

मोबाईल बॅटरीचा भयंकर स्‍फोट; स्‍फोटात मुलाच्या हाताची सर्व बोट गळून पडली

लक्ष्मण सोळुंके

जालना : जाफराबाद शहरात एका लहान मुलाला रस्त्यावर मोबाईलची बॅटरी सापडली आणि त्या लहान मुलांनी ती बॅटरी घरी घेऊन येत तिला (Jalna News) विद्युत वायरच्या साह्याने चार्जिंग करण्याचा प्रयत्न केला. त्या बॅटरीचा स्फोट (Mobile Blast) होवून त्या लहान मुलाच्या हाताची चार बोट निखळून पडल्याची घटना जाफ्राबाद शहरात घडलीय. अरबाज उर्फ गोलू असं या मोबाईल बॅटरीच्या स्फ़ोटात गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नाव असून त्यावर सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार आहे. (Live Marathi News)

अरबाज हा दोन दिवसांपूर्वी खेळत असताना त्याला रस्त्यावर एक मोबाईल एक मोबाईलची बॅटरी सापडली. त्याने ती बॅटरी घरी गेल्यानंतर चालू करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयन्त करत असताना त्यांनी बॅटरीला वायर लावून वायर प्लगमध्ये टाकून त्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी बटन चालू केले. बटन दाबताच बॅटरीचा भला मोठा आवाज होऊन स्फ़ोट झाला. या स्फ़ोटात त्याच्या हाताची चारही बोट अक्षरशः खाली गळून पडली. तर त्याच्या छातीला आणि डोळ्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

बेशुद्धावस्‍थेत नेले दवाखान्‍यात

बोटाचे तुकडे तुकडे गळून पडल्याने तो बेशुद्ध पडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) रेफर केले. त्यावर त्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र या स्फ़ोटात त्याच्या हाताची चार बोट निकामी झाली आहेत. अरबाज यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्थानिक लोकांनी आर्थिक जमवाजमावी करत त्यावर उपचार करण्यासाठी मदत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT