Manoj Jarange Hunger Strike Maratha Community Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: आमचा भाऊ अन्नपाण्याविना तडफडतोय, आम्हाला घास कसा जाईल; मराठा भगिणी ढसाढसा रडल्या, पाहा VIDEO

Manoj Jarange Hunger Strike Maratha Community : मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. आमच्या भावाला काही झाले तर सोडणार नाही, असा कडक इशाराही महिलांनी दिला.

Satish Daud

जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. सगेसोयरे अध्यादेश आणि हैदराबाद गॅझेटचे मागणी करत जरांगेंनी सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केलं आहे. आज रविवारी (ता २२) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवत चालली आहे. त्यामुळे मराठा बांधवांचे पाय अंतरवाली सराटीच्या दिशेने वळू लागले आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील अनेक महिला अंतरवाली सराटी येथे दाखल झाल्या असून त्यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला देखील कडक शब्दात इशारा दिला आहे.

साम टीव्हीसोबत बोलताना मराठा भगिणी म्हणाल्या, सरकारने आमची मागणी पूर्ण करून मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. तसेच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आमच्या भावाला काही झाले तर सरकारला सोडणार नाही, असा कडक इशाराही महिलांनी दिला.

आज आमचा भाऊ ६ दिवसांपासून अन्नपाण्याविना तडफडतो आम्हाला घरात बसून जेवणाचा घास कसा जाणार? असं म्हणत मराठा भगिणींनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्याने अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांची मोठी गर्दी जमत आहेत.

दुसरीकडे राज्य सरकारने देखील जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करण्यासाठी पाऊले उचलली आहे. मराठा आंदोलकांवरील बरीच गुन्हे मागे घेण्यात आली असून फक्त ३४ गुन्हे बाकी आहेत. गृहमंत्र्यांसोबत चर्चा करून आम्ही तेही मागे घ्यायला तयार असल्याचं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जरांगे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करा. तसेच त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आम्हाला सांगितल्याचं शंभुराज देसाई म्हणाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT