Antarwali Sarati Drone News Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange News: मनोज जरांगेंवर कुणाची पाळत? अंतरवाली सराटीत मध्यरात्री ड्रोनच्या घिरट्या, पाहा VIDEO

Satish Daud

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मध्यरात्री ड्रोन कॅमेऱ्याने घिरट्या घातल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

विशेष बाब म्हणजे, गेल्या आठवड्यातही अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) गावात २६ जूनला मध्यरात्री ड्रोन कॅमेराने घिरट्या घातल्या होत्या. यावेळी ड्रोनने गावातील रेकी केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. आता सोमवारी रात्री पुन्हा अंतरवाली सराटी गावात दोन ड्रोन कॅमेऱ्यांनी घिरट्या घातल्या.

यातील एक ड्रोन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil News) यांच्या घराजवळ तर दुसरे ड्रोन गावातील सरपंचाच्या घराजवळ असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. गावात ड्रोन कॅमेरे आल्याचं कळताच मोठी खळबळ उडाली. यानंतर गावातील सरपंचांसह नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव सध्या मराठा आंदोलनाचे केंद्र बनले आहे. गावात गेल्या दोन आठवड्यापासून ड्रोन कॅमेरे घिरट्या घालत असल्याने आंदोलनकर्त्यांवर कुणी नजर ठेवतंय का? असा संशय निर्माण झाला आहे.

रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या ड्रोनमुळं नागरिक धास्तावले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी तर केली जात नाही ना? असा संशय नागरिकांना आहे. पोलिसांनाही अद्याप याची माहिती लागत नसल्याने, ड्रोनचं गुढ कायम असून ड्रोन नक्की कोण उडवतयं? याचा तपास करावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT