Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची जालन्यात छापेमारी; भांग सदृश्य मादक पदार्थ केले जप्त

Jalna News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची जालन्यात छापेमारी; भांग सदृश्य मादक पदार्थ केले जप्त

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना शहरातील बडी सडक परिसरात असलेल्या कोमल गिफ्ट गॅलरी सेंटरमधून मोठ्या प्रमाणात (Jalna News) भांग सदृश्य पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Police) मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करत मादक पदार्थ जप्त केले आहे. (Tajya Batmya)

जालना शहरातील बडी सडक परिसरात असलेल्या गिफ्ट गॅलरी सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून २५ ते ३५ किलो वजन असलेला भांग सदृश्य मादक पदार्थ जप्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून या गिफ्ट गॅलरी सेंटरमधून मोठ्या प्रमाणात भांग दृश्य अमली मादक पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्री नऊच्या सुमारास बडी सडक परिसरात (LCB) असलेल्या कोमल गिफ्ट गॅलरी सेंटरमध्ये धाड टाकून अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत गिफ्ट गॅलरी चालकाला ताब्यात घेतल आहे.

उच्चभू वस्ती समजल्या जाणाऱ्या बडी सडक परिसरात असलेल्या गिफ्ट गॅलरी सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भांग दृश्य मादक पदार्थ आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. तर या मागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली जात आहे. या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे पोलीस शाखेचे पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT