Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: झोपेतच अंगावर अँसिड टाकून वृद्धाची हत्या; जादूटोण्याचा संशय, एकाला अटक

Jalna News : झोपेतच अंगावर अँसिड टाकून वृद्धाची हत्या; जादूटोण्याचा संशय, एकाला अटक

लक्ष्मण सोळुंके

जालना : गावात वयोवृद्ध व्यक्ती जादूटोणा करत असल्याचा संशय पाहिला होता. या संशयातून अंगावर अँसिड (Crime News) टाकून खून केल्याची घटना जालना (Jalna News) जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही घटना घडली आहे. (Live Marathi News)

जादूटोण्याचा संशय असल्याने एका वृद्धाच्या अंगावर अँसिड टाकून खून करण्यात आला. श्रीरंग शेजुळ असं मृत्युमुखी पडलेल्या (Jafrabad) वृद्धाचे  नाव आहे. श्रीरंग शेजूळ हे अंगणात बाजेवर झोपलेले असताना शेजुळ यांचा अचानक ओरडण्याचा आवाज आला. त्यांच्या अंगावर द्रव पदार्थ टाकल्याचं आढळून आले. मात्र यावेळी आजूबाजूला कुणीही आढळून आलं नाही. त्यामुळे श्रीरंग शेजुळ यांना शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

पोलिसांनी एकास केले अटक 

वृद्धाच्या हत्येप्रकरणी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात 2 संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गावातीलच नंदू शेजुळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जाफ्राबाद पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळ्यात भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT