Jawan Death News Saam Tv
महाराष्ट्र

Jawan Death News : धक्कादायक! सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या

Rohini Gudaghe

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

जालन्यामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सुट्टीवर असलेल्या एका जवानाचा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे टेंभुर्णी गावावर शोककळा पसरली आहे, तर जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसानंतर कर्तव्यावर हजर होण्यापूर्वीच या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

जवानाचा अपघाती मृत्यू

अमोल आढाव, असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. तो जालन्यातील टेंभुर्णी (Tembhurni) येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. भारतीय लष्करामध्ये सेवेत असलेल्या अमोलचा राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू (Jalna News) झालाय. या घटनेमुळे अमोल जखमी झाला होता. त्याला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलंय.

जालन्यात हळहळ

अमोल भारतीय लष्कराच्या ए.एस.जी. ५५६ बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होता. तो गेल्या महिन्याभरापासून सुट्टीवर होता. दरम्यान दोन दिवसानंतर तो कर्तव्यावर हजर होणार होता, परंतु त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला (Jawan Death) घातला. अमोलचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरलीय. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुली आणि मोठा भाऊ आहेत. या घटनेनं टेंभुर्णी गावाला चांगलाच हादरा बसलेला आहे.

यवतमाळमधील घटना

यवतमाळमध्ये जून महिन्यात एका जवानाचा मृत्यू झाला होता. सीआरपीएफ जवानांच्या वाहनांना एका भरधाव ट्रकने धडक दिली होती. या अपघातात एका सीआरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू तर ४ जण जखमी झाले ( Jawan Death News) होते. गडचिरोलीच्या दिशेने जाताना समृद्धी महामार्गावर जवानांच्या वाहनाला अपघात झाला होता. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका जवानाने जीव गमावल्याचं समोर आलं होतं. इतर जखमी जवानांवर नाईक रूग्णालयात उपचार सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT