Jalna Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Jalna Bajar Samiti : जालना बाजार समिती प्रशासकीय मंडळ नियुक्तीला हायकोर्टात आव्हान; अर्जुन खोतकरांसह १५ जणांना नोटीस

Jalna News : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या सहकार खात्याने जालना जिल्हा निबंधक अनिल दाबशेडे यांची बाजार समितीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रशासकीय (Bajar Samiti) मंडळाच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात आव्हान देण्यात आले आहे. (Jalna) खंडपिठाने याचिकाकर्ता यांची रिट याचिका स्विकृत करून मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर, प्रशासक भास्कर दानवे यांच्यासह पंधरा प्रशासकांना नोटीसा बजावल्या आहेत.  (Breaking Marathi News)

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या सहकार खात्याने जालना जिल्हा निबंधक अनिल दाबशेडे यांची बाजार समितीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. राज्य सरकारने मागील काही महिन्यांपुर्वी प्रशासकाची नेमणूक रद्द करून त्या ठिकाणी मुख्य प्रशासक म्हणून (Arjun Khotkar) अर्जुन खोतकर यांच्यासह प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याचे आदेश निर्गमित केले होते. राज्य शासनाने केलेली ही नेमणूक बेकायदेशीर असल्याचे सांगून दिलीप रामराव शिंदे यांनी वकीलामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय मंडळा विरूध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या (Sambhajinagar) संभाजीनगर खंडपिठात रिट याचिका दाखल केली होती.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

नोटीस बजावत २३ ला हजर राहण्याचे निर्देश 

या सुनावणीनंतर १५ एप्रिलला संभाजीनगर खंडपिठाने मुख्य प्रशासक अर्जुन खोतकर, प्रशासक भास्कर दानवे यांच्यासह प्रशासकीय मंडळातील प्रशासकांना नोटीस बजावत २३ एप्रिल रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर, भास्कर दानवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Chanakya Niti: 'या' ६ लोकांना कधीही आर्थिक मदत देणे टाळा, ते तुमच्या पैशाचा नाश करतात

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

SCROLL FOR NEXT