IPL Cricket Online Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Cricket Online Betting : आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा; जालन्यात पाच जण ताब्यात, चंदनझिरा पोलिसांची कारवाई

Jalna News : जालन्यामध्ये ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. चंदनझिरा पोलिसांनी आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: मागील आठवड्यापासून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट मॅचचा थरार सुरु झाला आहे. या टी- २० मॅचेस सुरु असून यावरील प्रत्येक सामन्यावर ऑनलाईन सट्टा जोरदार सुरु आहे. अशाच प्रकारे जालन्यामध्ये ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. चंदनझिरा पोलिसांनी आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जालना शहरातील पाणीवेस भागातील कुंभार गल्ली येथील शेख मुस्तकीन शेख वजीर (वय ३४) हा तरुण क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून चंदनझिरा पोलिसांनी शेख मुस्तकीन शेख वजीर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता या ऑनलाईन सट्टा लावण्याचे हिंगोली कनेक्शन निघाले. 

हिंगोलीतून चार जणांना घेतले ताब्यात 

यात हिंगोली येथील गोविंद गुप्ता याच्यासह त्याच्या साथीदारांकडे ऑनलाइन क्रिकेट मॅचवर सट्टा लावल्याचे कबूल केले. त्यामुळे चंदनझिरा पोलिसांनी हिंगोली येथे जाऊन आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या ४ जणांना ताब्यात घेतले आहे. गोविंद गुप्ता, सचीन जैन, विशाल बनकर आणि संतोष लहाने अशी हिंगोली येथून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत १ लॅपटॉप, महागडे मोबाईल आणि १ वाहन असा एकूण ८ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान आयपीएल क्रिकेट मॅचवर जोरदार सट्टा लावण्यात येत असून या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्री छगन भुजबळ यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत...

Dog Bite: कुत्रा चावला, ३ इंजेक्शनही घेतले, पण..; उपचारादरम्यान ८ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयातच मृत्यू

Akki Roti Recipe: सकाळच्या नाश्ताला काही वेगळं करायचंय? तर अक्की रोटी अन् नारळाची चटणी एकदा करून पाहाच

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका मुख्य सभेत पाणी प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT