IPL Online Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Online Betting : आयपीएल मॅचवर सट्टा; जालन्यातून दोघेजण ताब्यात, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

jalna News : आयपीएल क्रिकेट मॅच रोमांचक स्थितीत पोहचली आहे. रोज मॅच होत असून कोण जिंकणार, कोण किती रन काढणार याचे गणित बांधले जात आहे. यासाठी ऑनलाईन सट्टेबाजार जोरदार सुरु आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल टी २० क्रिकेट मॅचचा सध्या थरार सुरु आहे. येतॉ प्रत्येक मॅचवर जोरदार सट्टा चालविला जात आहे. अशातच जालन्यात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली असनू या कारवाईत १ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

आयपीएल क्रिकेट मॅच रोमांचक स्थितीत पोहचली आहे. रोज मॅच होत असून कोण जिंकणार, कोण किती रन काढणार याचे गणित बांधले जात आहे. यासाठी ऑनलाईन सट्टेबाजार जोरदार सुरु आहे. त्यानुसार जालन्यामध्ये देखील जोरदार सट्टा चालविला जात होता. याठिकाणी सदर बाजार पोलिसांनी कारवाई करत स्वप्नील राठी आणि मोहन खाकिवाले यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

मोबाईलवरून सुरू होता सट्टा 

स्वप्नील राठी आणि मोहन खाकिवाले हे दोन तरुण आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून सदर बाजार पोलिसांनी सदरील दोन तरुणांना जुना मोंढा भागातून ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन तपासले असता त्यांनी मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने क्रिकेट मॅचवर सट्टा लावल्याच समोर आलं. 

दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी दोन्ही सट्टेबाजांना विचारपूस केली असता त्यांनी बुकी शौर्य घोसले याच्या सांगण्यावरून सट्टा लावल्याचे कबूल केलं. या कारवाईत पोलिसांनी २ हजार रुपये रोख आणि २ महागडे मोबाईल असा एकूण १ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. सट्टेबाजारात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily mistakes: तुमच्या दररोजच्या ५ चुका हार्ट अटॅक येण्यासाठी ठरतायत कारणीभूत; वेळीच व्हा सावध

Saif Ali Khan : बॉलिवूडच्या 'नवाब'चा थाटच न्यारा; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, आकडा पाहून फिरतील डोळे

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज पुन्हा उभारणार- मंत्री उदय सामंत

Bihar Cabinet Ministers List: नितीश कुमार यांच्यासोबत २६ मंत्र्यांनी घेतली शपथ; वाचा संपूर्ण लिस्ट

Mix Vegetable Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखा टेस्टी व्हेज पुलाव, या मसाल्यांचा द्या तडका

SCROLL FOR NEXT