Jalna Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalna Heavy Rain : परतूर मंठा तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस; शेतातही साचले पाणी

Jalna News : राज्यात साधारण दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामूळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पुढील आठवड्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरु असून रोज कोठे ना कोठे पावसाची हजेरी लागत आहे. अशातच जालना जिल्ह्यात देखील अवकाळीने थैमान घातले असून शनिवारी दुपारच्या सुमारास परतूर मंठा तालुक्यात वाऱ्यासह विजेच्या कडकडात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली. यामुळे परतूर शहरातील नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले असून अनेक शेतातमध्ये पाणी साचल्याने चित्र पाहण्यास मिळाले. 

राज्यात साधारण दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामूळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पुढील आठवड्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर बहुतांश शेतकऱ्याचा मका खुडून शेतात पडलेला आहे. तो देखिव पाण्यात भिजत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

नाले वाहिले तुडुंब 

जालन्यातील परतुरसह मंठा तालुका आणि परिसरामध्ये शनिवारी मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे. पावसामुळे परतूर शहरात नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परतुर तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. परतुर शहरासह सातोना, आंबा, आष्टी आणि शिंगोणा येणारा आणि पाटोदा परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. 

पावसाळ्याप्रमाणे साचले पाणी 

दरम्यान अवकाळी पावसामुळं भर उन्हाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. छोट्या नाल्यांना पाणी येऊन शेतातही पाणी साचले आहे. यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारे चित्र भर उन्हाळ्यात पाहण्यास मिळत आहे. दरम्यान सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल आणि चिंतेत सापडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

SCROLL FOR NEXT