Godavari River Saam tv
महाराष्ट्र

Godavari River : गोदावरी नदी कोरडी ठाक; जालन्यात गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई

Jalna News : वाढत्या तापमानामुळे तलाव, धरणातील पाणी पातळीत घट होत आहे. तर जमिनीतील पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यानुसार जालन्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी देखील कोरडी पडल्याने तीव्र पाणी टंचाईचा सामना

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
जालना
: उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. दरम्यान जालन्यात गोदावरी नदी देखील कोरडी ठाक पडल्यानं गोदाकाठच्या शेकडो गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालीे आहे. गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे जनावरांना पिण्यास पाणी देणे देखील आता जिकरीचे झाले आहे. 

राज्यात सर्वदूर भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. मार्च, एप्रिल महिन्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुख्य म्हणजे वाढत्या तापमानामुळे तलाव, धरणातील पाणी पातळीत घट होत आहे. तर जमिनीतील पाण्याचे स्रोत देखील आटले आहेत. त्यानुसार जालन्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदी देखील कोरडी पडल्याने तीव्र पाणी टंचाईचा सामना परिसरातील गावांमध्ये करावा लागत आहे. 

पाणी संकट गडद 

जालना जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून गोदावरी नदी वाहते. त्यामुळे गोदाकाठचे गाव ही गोदावरी नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र, यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरी कोरडी ठाक पडली आहे. गोदाकाठच्या नागझरी, खामगाव, सावळेश्वर, पिंपळगाव, गंगावाडी, राक्षसभुवन, पांचाळेश्वर, शहागड, गोरीगंधारी, डोमलगाव, साष्ट पिंपळगाव, बळेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. 

जयकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी 

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात यावं; अशी मागणी गोदाकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, अद्याप पर्यंत गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी सोडलं नसल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना गोदाकाठच्या ग्रामस्थांना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT