Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : संभाजी भिडेंच्या प्रतिमेची अंत्ययात्रा; शाब्दिक चकमकीनंतर पोलिसांचा समता परिषदेच्या आंदोलकांवर लाठीचार्ज

Jalna News संभाजी भिडेंच्या प्रतिमेची अंत्ययात्रा; शाब्दिक चकमकीनंतर पोलिसांचा समता परिषदेच्या आंदोलकांवर लाठीचार्ज

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : महात्मा फुले यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय समता परिषदेच्यावतीने (Jalna News) जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले. समता परिषदेच्यावतीने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलीस व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.  (Maharashtra News)

जालना शहरातील लहुजी साळवे चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांनी महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजी भिडे यांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा काढत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलना दरम्यान पोलीस (Police) आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. 

दोन आंदोलक ताब्यात 

सादर आंदोलनादरम्यान पोलिसांनी २ आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान भिडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आंदोलकांनी केली. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी नाहक लाठीचार्ज केला; असा आरोप समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांसाठी मोफत बससेवा, तरुणांना मोफत टॅबलेट; मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये लेटर वॉर

मराठी सक्तीच्याविरोधात रिक्षा-टॅक्सीचालकांची हायकोर्टात धाव; निर्णय स्थगितीची मागणी

Kalyan Tourism : एक दिवसाची भन्नाट ट्रिप! फिरा कल्याणजवळची ५ बेस्ट मॉन्सून पिकनिक स्पॉट्स

किडनी स्टोन की युरीन इन्फेक्शन? दोघांमधील फरक कसा ओळखायचा?

SCROLL FOR NEXT