jalna News  Saam tv
महाराष्ट्र

Jalna : पाण्याअभावी पिके करपली; आठ गावातील शेतकऱ्यांचे कालव्यावर आंदोलन, बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी

jalna News : गोदावरी नदीवरील कोरड्या पडलेल्या जोगलादेवी बंधाऱ्यात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे; या मागणीसाठी आठ गावातील शेतकऱ्यांनी डाव्या कालव्याच्या सीआर गेटवर धरणे आंदोलन

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: उन्हाच्या तीव्रतेत पाणी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे पाण्याअभावी पिकांना पाणी देता येणे आता शक्य नाही. पाणी नसल्याने शेतातील पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडून जोगलादेवी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी बंधाऱ्यावरच धरणे आंदोलन करण्यात आले आहे. 

अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. त्याचाच परिणाम आता शेतकऱ्यांच्या पिकांना बसू लागला आहे. ही पिके करपून आणि सुकून जाऊ लागल्याने हातातील पिके निसटून जाण्याची धास्ती या शेतकऱ्यांना लागल्याने हे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

बंधाऱ्यावर धरणे आंदोलन 

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आता करंजाळा येथील गोदावरी नदीवरील कोरड्या पडलेल्या जोगलादेवी बंधाऱ्यात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे; या मागणीसाठी सात ते आठ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत डाव्या कालव्याच्या सीआर गेटवर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. 

तर उद्यापासून उपोषण 

बंधाऱ्याद्वारे पाण्याचा प्रश्न सुटणाऱ्या सात ते आठ गावातील शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत पाणी सोडलं नाही; तर उद्यापासून याच ठिकाणी सर्व शेतकरी उपोषणाला बसणार असल्याचाही इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. यामुळे स्थानिक प्रशासन शेतकऱ्यांच्या मागणीबाबत आता काय निर्णय घेते हे पाहणे मगत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT